LOGO
Home का वापरले जाते टायरमध्ये नायट्रोजन ?
Technology

का वापरले जाते टायरमध्ये नायट्रोजन ?

- 2023-06-16
का वापरले जाते टायरमध्ये नायट्रोजन ?

 

काही वर्षांपूर्वी सर्वच गाड्यांमध्ये साधी हवा भरली जायची परंतु कालांतराने बऱ्याच ठिकाणी व काही फोर व्हीलर गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टायरची व प्रवाशांची सेफ्टी म्हणून व टायर चांगला टिकावा म्हणून नायट्रोजन भरताना दिसतात तर खरोखरच आपल्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मध्ये नायट्रोजन भरणे कितपत योग्य असते हेच पाहणार आहोत.

 

जेव्हा आपण आपल्या गाडीमध्ये साधी हवा भरत असतो त्यावेळी आपल्या टायरमध्ये ७८% नायट्रोजन २१ टक्के ऑक्सिजन व एक टक्के इतर वायू म्हणजेच कार्बन-डाय-ऑक्साइड निऑन यांसारखे वायू जात असतात पण जेव्हा आपण आपल्या गाडीमध्ये नायट्रोजन भरत असतो त्यावेळेस त्या टायर मध्ये पूर्णपणे इतर गॅस वगळता नायट्रोजन हेच असते.

 

टायर मध्ये नायट्रोजन भरल्यामुळे होणारे फायदे


 जेव्हा आपण आपल्या टायर मध्ये हवा भरत असतो त्यावेळी त्या हवे बरोबर टायर मध्ये जे  रेणू जात असतात हे नायट्रोजनच्या तुलनेमध्ये खूपच लहान असतात ज्यामुळे ते हळूहळू करून नायट्रोजनच्या तुलनेमध्ये लवकर टायर मधून बाहेर पडतात त्यामुळे टायर मधील हवेचा दाब लवकरात लवकर कमी होतो व जेवढे त्या गाडीवर भार जास्त असेल तेवढाच हवेचा दाब लवकरात लवकर कमी होतो त्याच्याच विरुद्ध जेव्हा आपण गाडीमध्ये नायट्रोजन भरतो तेव्हा नायट्रोजनमध्ये जे रेणू असतात ते साधारण हवेच्या तुलनेमध्ये थोडे मोठे असतात त्यामुळे ते सहजरीत्या टायर मधून लवकर बाहेर पडत नाही व लवकर बाहेर न पडल्यामुळे टायरचा दाब  कमी होत नाही. जेव्हा आपण साध्या गाडीमध्ये हवा भरतो तेव्हा ती गाडी सतत चालत असेल तर त्यामधील हवा १५ ते २० दिवसांपर्यंत चालते पण तेच जर नायट्रोजन भरले असेल तर आपल्या टायरचा दाब  हा नॉर्मल कंडिशन मध्ये जवळपास तीन ते चार महिन्यांपर्यंत सुद्धा चालतो हा एक फायदा नायट्रोजन भरल्यामुळे होतो.


जेव्हा टायर मध्ये साधी हवा असते व गाडीत जलद गतीने चालत असते त्यावेळी टायरच्या आत मध्ये तापमान वाढते व त्यामुळे टायरची लाईफ काही प्रमाणात कमी होत असते त्याच्यात विरुद्ध जेव्हा आपण टायरमध्ये नायट्रोजन भरतो त्यावेळेस नायट्रोजन हे थंड असल्या कारणाने साध्या हवेच्या तुलनेमध्ये टायरच्या आत मध्ये तापमान वाढ होत नाही ज्यामुळे टायरचे आयुष्य साधारण  हवेच्या तुलनेमध्ये थोडे चांगले राहते

नायट्रोजन भरले असल्याकारणाने टायर मधून हवा कमी होण्याचे प्रमाण हे जवळपास ६०% नी कमी होत असते.


Car tyre and nitrogen bottle line icon जेव्हा टायर मध्ये साधी हवा भरली जाते त्यावेळेस नायट्रोजन बरोबरच दुसरे वायु जात असल्यामुळे टायरच्या आत मध्ये एक प्रकारचा ओलावा तयार होतो ज्यामुळे टायर नायट्रोजनच्या तुलनेमध्ये थोडे लवकर खराब होतात व टायर बसवण्याची जी रिंग असते तिला सुद्धा ओलसरपणा येत असल्यामुळे ती टायरला सुद्धा कुठेतरी डॅमेज करत असते त्याच्यात विरुद्ध जर टायर मध्ये नायट्रोजन असेल तर टायरच्या आत मध्ये अशा प्रकारचा ओलसरपणा येत नाही व ट्यूब वर रिम खूप चांगली राहते तसेच हवेचा दाब सुद्धा व्यवस्थित राहिल्याने मायलेज सुद्धा चांगले मिळते.

 

नायट्रोजन भरतेवेळी काय काळजी घ्यावी ?


  जर तुम्ही गाडीमध्ये पहिल्यांदाच नायट्रोजन भरत असाल तर नायट्रोजन भरत असताना आवर्जून टायर मध्ये असलेली जुनी हवा काढून पूर्णपणे नायट्रोजन भरून घ्यावा कारण जर अर्धी हवा असताना आपण नायट्रोजन भरला तर त्या नायट्रोजनचा इतका जास्त फायदा होणार नाही व तुम्ही ज्या फायद्यासाठी नायट्रोजन भरणार आहात  त्यालाही महत्व राहणार नाही. परंतु प्रवासामध्ये सर्वच ठिकाणी नायट्रोजन उपलब्ध होईलच असे नाही अशावेळी गाडीमध्ये गरजेसाठी साधी हवा भरली तरी चालेल.

 

नायट्रोजन भरण्यासाठी येणारा खर्च ?


नायट्रोजन भरायचे असेल तर प्रत्येक ठिकाणी त्याचे चार्जेस वेगवेगळे आहेत फोर व्हीलर गाडीसाठी काही ठिकाणी १२० रुपये घेतले जातात तर काही ठिकाणी १६० रुपयांच्या आसपास खर्च येतो  म्हणजेच नायट्रोजन साध्या हवेचे तुलनेमध्ये थोडे महागच पडते.

 

 

White big rig long haul semi truck with turned on headlights, transporting commercial cargo, driving at high speed at night, in raining weather. AI generative

नायट्रोजन कोणी वापरावे ?

नायट्रोजन कोणी वापरावे व वापरू नये हे प्रत्येक जण आपापली गाडी कशी वापरतो यावर अवलंबून असते.साधारणता टू व्हीलर मध्ये नायट्रोजनचा वापर केला जात नाही कारण गाडीचे वजन कमी असल्याने त्याच्या टायरवर अतिरिक्त भार येत नाही त्याच विरुद्ध फोर व्हीलर व मालवाहतूक गाड्या या वजनाला जड व त्यांचा वापर आणि गती  अधिक असल्यामुळे यांमध्ये नायट्रोजन भरणे फार गरजेचे आहे.