LOGO
Home सीमांत शेतकरी गट बांधणी (Farmers Group) योजना
Government Schemes

सीमांत शेतकरी गट बांधणी (Farmers Group) योजना

- 2023-06-22
सीमांत शेतकरी गट बांधणी (Farmers Group) योजना

सीमांत शेतकरी गट बांधणी (Farmers Group) योजना या योजने अंतर्गत शेतकर्‍यांच्या गटाला अवजारांवरती ४०% अनुदान तसेच गोदाम बांधकाम, नवीन तंत्रज्ञान, प्रशिक्षण व प्रक्रिया उद्योगास सहाय्य मिळणार आहे.

 

योजनेचे उद्दिष्टे:


या योजनेमुळे समूह शेतीला वाव मिळणार आहे तसेच या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी गटाने अन्न प्रक्रिया प्रकल्प व स्वतःची विक्री व्यवस्था उभारावी हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

 

योजनेच्या अटी:


या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी ११ शेतकर्‍यांचा गट असणे आवश्यक आहे

 


लाभार्थी: शेतकरी


राज्य: महाराष्ट्र

 

योजनेचा लाभ:


१)अवजार बँक ४०%  अनुदान


)गोदाम बांधकाम


३)निष्ठांची एकत्रित खरेदी (बियाणे,खते कीटकनाशके, तणनाशके)


)नवीन तंत्रज्ञान, प्रशिक्षण निविष्ठा, अभ्यासदौरे


)शेतकरी उत्पादक कंपनी(FPC) स्थापना करणेस वाव


६)प्रक्रिया उद्योगास सहाय्य

 

आवश्यक कागदपत्रे:


१)किमान ११ शेतकरी


२)सर्वांचे ७/१२, ८ अ किंवा शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र


३)सर्वांचे आधार कार्ड


४)प्रथम बैठकीचे इतिवृत्त व फोटो, गटाच्या नावाचा शिक्का


५)१२५०/- रुपये (नोंदणी फी)

 

कसा घ्यावा योजनेचा लाभ :


योजनेसंदर्भात सखोल माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळील कृषी कार्यालयात संपर्क साधावा व योजनेस पात्र असल्यास वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता.