LOGO
Home पशुसंवर्धन योजना
Government Schemes

पशुसंवर्धन योजना

- 2023-06-21
पशुसंवर्धन योजना


पशुसंवर्धन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येणार आहे तसेच त्यांना लागणाऱ्या खाद्यांवरती १००% अनुदान देण्यात येणार आहे.

 

योजनेचे उद्दिष्टे:


या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी संलग्न व्यवसाय करून एक शाश्वत असे उत्पन्न मिळवून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात असणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना लाभकारी आहे

 

लाभार्थी शेतकरी


राज्य - महाराष्ट्र

 

 

योजनेचा लाभ:


·      विशेष घटक योजनेअंतर्गत "१०+१ शेळी गट वाटप करणे" (अनु. जाती प्रवर्ग अनुदान रुपये ७७ हजार ६५९)

·      विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप (अनुदान ६३ हजार ६९६)

·      खाद्य वाटप करणे (१००% अनुदान)

·      50 टक्के अनुदानावर १०० एकदिवशी पिल्लांच्या गटाचे वाटप (अनुदान ८ हजार रुपये)

 

आवश्यक कागदपत्रे:


·      आधार कार्ड व फोटो

·      ७/१२ व ८ अ,जातीचे प्रमाणपत्र

·      रेशन कार्ड, अपत्य घोषणापत्र

·      बँक पासबुकची झेरॉक्स

·      पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

 

कसा घ्यावा योजनेचा लाभ:


महाडीबीटी-कृषी यांत्रिकीकरण योजनेसंदर्भात सखोल माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळील कृषी कार्यालयात संपर्क साधावा व योजनेस पात्र असल्यास वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता.