LOGO
Home महाडीबीटी-कृषी यांत्रिकीकरण योजना
Government Schemes

महाडीबीटी-कृषी यांत्रिकीकरण योजना

- 2023-06-21
महाडीबीटी-कृषी यांत्रिकीकरण योजना


 महाडीबीटी-कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी एक लाखाहून अधिक अनुदान मिळणार आहे तसेच इतर अवजारांसाठी योजनेनुसार अनुदान मिळणार आहे.

 

योजनेचे उद्दिष्टे:


सामान्य व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आधुनिक(यांत्रिक) शेतीकडे वळावे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना खरोखरच वरदान ठरणार आहे.

 

लाभार्थी - शेतकरी


राज्य - महाराष्ट्र

 

योजनेचा लाभ:


·      ट्रॅक्टर साठी १.२५ लाख किंवा १ लाख रुपये

·       इतर अवजारांसाठी ५०% किंवा ४०% योजनेनुसार अनुदान

 

आवश्यक कागदपत्रे :


ü ७/१२, ८ अ

ü बँक पासबुक

ü आधार कार्ड

ü आधार लिंक असणारा मोबाईल क्रमांक

ü अवजारांचे दर पत्रक

ü अवजार टेस्ट रिपोर्ट

 

कसा घ्यावा योजनेचा लाभ:


महाडीबीटी-कृषी यांत्रिकीकरण योजनेसंदर्भात सखोल माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळील कृषी कार्यालयात संपर्क साधावा व योजनेस पात्र असल्यास वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.