LOGO
Home विसर्जनावेळी बुडाला अन 'बाप्पा'मुळे चमत्कार घडला
News

विसर्जनावेळी बुडाला अन 'बाप्पा'मुळे चमत्कार घडला

- 2023-10-04
विसर्जनावेळी बुडाला अन 'बाप्पा'मुळे चमत्कार घडला


 

'देव तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय गुजरातच्या सुरत येथे आला. शुक्रवारी दुपारी समुद्राच्या लाटेमुळे वाहून गेलेला १३ वर्षाचा लखन हा मुलगा तब्बल २४ तास उलटून गेल्यावर शनिवारी सुखरूप आढळला. विसर्जित केलेल्या गणेश मूर्तीच्या चौकटीचा (मोठा प्लायवूड) आधार घेत त्याने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. गोदादारा परिसरातील लखन कुटुंबासह गणेश विसर्जन बघायला डोमसच्या किनारपट्टीवर गेला होता, अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे तो आणि त्याचा लहान भाऊ करण बुडू लागले. गोंधळानंतर किनाऱ्यावरील लोकांनी करणला वाचवले. पण, लखन बुडाला. कुटुंबीयांनी मुलगा हरवल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. लखनचा मृतदेह सापडला तर अंत्यसंस्कार करता येतील, अशा विचारात कुटुंबीय होते. पण, शनिवारी संध्याकाळी त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. रसिक तांडेल हा मच्छीमार बोटीवर असताना त्याची नजर लखनवर पडली. किनाऱ्यापासून सुमारे १८ नॉटीकल मैल दूर समुद्रात तो तरंगत्या मोठ्या प्लायवूडला पकडून राहिला. तांडेलने लगेच मुलाला बोटीतून किनारपट्टीवर आणले. पोलिसांनाही कळवले. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, नेटकरीही या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करीत आहेत.