LOGO
Home कृषी विभाग-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना(MREGS)
Government Schemes

कृषी विभाग-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना(MREGS)

- 2023-06-22
कृषी विभाग-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना(MREGS)

कृषी विभाग-महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना(MREGS) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड, फुलझाडे लागवड, गांडूळ खत युनिट व शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

 

योजनेचे उद्दिष्टे:


शेतकऱ्यांनी अल्प नफा देणाऱ्या पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून आधुनिक पिकांची लागवड करावी व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

 

 लाभार्थी - शेतकरी


 राज्य: महाराष्ट्र

 

योजनेचा लाभ :


१००% अनुदान (३ वर्षात विभागून)

१) फळबाग लागवड (सलग/ बांधावर /पडीक जमिनीवर)

    योजनेत विविध फळ पिकांचा समावेश

२) फुलझाडे : गुलाब, मोगरा, निशिगंधा, सोनचाफा

३) गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट युनिट

४) शेततळे

 

आवश्यक कागदपत्रे:


१) अर्ज

२) ७/१२, ८ अ

३) बँक पासबुक

४) आधार कार्ड, जॉब कार्ड

) ग्रामसभा ठराव व इतर कागदपत्र आवश्यक

 

कसा घ्यावा योजनेचा लाभ :


योजनेसंदर्भात सखोल माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळील कृषी कार्यालयात संपर्क साधावा व योजनेस पात्र असल्यास वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता.