LOGO
Home “ओंकाराच्या उच्चाराने सुधारेल शारीरिक व मानसिक स्वास्थ्य”
Life Style

“ओंकाराच्या उच्चाराने सुधारेल शारीरिक व मानसिक स्वास्थ्य”

- 2023-06-16
“ओंकाराच्या उच्चाराने सुधारेल शारीरिक व मानसिक स्वास्थ्य”

 

 

हिंदू धर्मात ओंकाराचे अनन्यसाधारण महत्व आहे. जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारात ओंकार नसल्यास मंत्र अपू्र्ण वाटतात.

परंतु धार्मिक महत्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक मानसिक महत्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक मानसिक स्तरावर अनेक फायदे होतात.

तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

 

कसे करावे ओम उच्चारण?

 

  ओम उच्चारण करण्यासाठी पाठीचा कणा ताठ ठेवून ध्यानमुद्रेत बसावे.

  डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्यावा आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडावा.

  या काळात पुर्ण शरीरात कंपन (VIBRATION) होईल याचा प्रयत्न करावा.

 जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर शरीरात जास्त कंपन निर्माण होऊन अधिक   फायदा होईल.

 

ओमकार जपाचे महत्व आणि त्याचे शारीरिक व मानसिक जीवनावर होणारे परिणाम :

 

१)     मानवी मनाची शुद्धता करणे.

 

२)     मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.

 

३)     मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.

 

४)     शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.

 

५)      ओंकाराच्या जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होवून, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.

 

 

 

 

 

 

ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण

  

 

१. थायरॉईड -

 ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो.

 

२. अस्वस्थता -

 तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा.

 

३. रक्तप्रवाह -

Free photo beautiful woman meditating outdoors ओंकाराच्या उच्चारामुळे हृदयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा होण्यास मदत होते यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

 

४. स्फूर्ती -

 ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो.

 

५. थकवा -

 ओंकाराच्या उच्चाराने थकवा दूर होतो. थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही.

 

६. फुफ्फुस -

 ओंकारच्या उच्चारावेळी दीर्घ श्वास घेऊन तो हळूहळू सोडला जातो या क्रियेमुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते.

 

७. पाठीचा कणा -

 ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवतात.